राहुल गांधी यांना अटक

May 11, 2011 6:03 PM0 commentsViews: 6

11 मे

उत्तर प्रदेशातल्या ग्रेटर नॉयडा भागात शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. या शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी आज काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी भट्टा परसौल गावात पोहचले असता त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबरच रीटा बहुगुणा यांनाही अटक झाली आहे. जमावबंदी कायद्याच उल्लंघन केल्याप्रकरणी या नेत्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली.

151 कलमाअन्वये राहुल गांधी यांना अटक करण्यात आली आहे. उद्या त्यांना उप विभागीय दंडाधिकार्‍याकडे सादर करण्यात येणार आहे. अटकेपूर्व राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांना कोणतीही पुर्वसूचना देण्यात आल्या नव्हत्या. हे सर्व लोकशाहीच्या विरुध्द असल्याची तक्रार काँग्रेस पक्षांना केली. या सर्वांना आज गेस्ट हॉउसमध्ये ठेवण्यात येईल.

दरम्यान भूसंपादनाला विरोध करणार्‍या शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी आज काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी भट्टा परसौल गावात पोहचले. पोलिसांनी शेतक-यांवर केलेल्या गोळीबाराची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. शेतकर्‍यांवर होत असलेले अत्याचार पाहून मला भारतीय असल्याची लाज वाटते असंही ते म्हणाले. तर राहुल गांधींचे उत्तर प्रदेशात येणं ही राजकीय स्टंटबाजी आहे असं मायावती सरकारने म्हटलंय.

ग्रेटर नॉयडाच्या बाहेर असलेल्या या भट्टा पारसौल गावातला चहाचा क्षण. खरं तर आता त्याला राजकीय रणांगणाचे स्वरुप आलंय. एका पारड्यात उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती आहेत. तर दुसरीकडे याच प्रकल्पाविरोधात शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून उत्तरप्रदेशच्या राजकीय लढ्याची सुरुवातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.

सध्या त्यांच्यासोबत त्यांचे राजकीय सल्लागार आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंगही आहेत. राजकारण करण्यामध्ये हातखंड असलेल्या दिग्विजय सिंगांनी कशापद्धतीने या आंदोलनामध्ये शेतकर्‍यांचा संताप वाढवण्याचा प्रयत्न केला.

गांधी घराण्याचा राजकीय वारसा असलेल्या अमेठी आणि रायबरेलीपुरतंच राहुल गांधींचे उत्तरप्रदेशातील राजकीय वर्तुळ मर्यादित होतं. आणि उत्तरप्रदेशच्या राजकारणात काँग्रेसचा नेता म्हणून राहुलने उडी घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे काँग्रेसला वाटतं. रस्त्यातील काही अंतर मोटारसायकलीवरून जायचं तर काही अंतर पायी चालत जाऊन लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी त्यांनी मायावती शेतकर्‍यांच्या अपराधी कशा आहेत असं शेतकर्‍यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला.

जी गोष्ट राहुल गांधी करु शकतात, तर अमरसिंग का नाही करु शकणार राहुल सारखीच काहीशी कृती अमरसिंगांनी या भागात केली. समाजवादी पक्षातून हकालपट्टी झालेल्या अमरसिंगांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नी मायावतींवर हल्लाबोल केला. पण अशापद्धतीने तिथल्या गावात राजकीय रण माजवू इच्छिणार्‍या नेत्यांबद्दल शेतकर्‍यांना काय वाटतंय.

याठिकाणी राहुल गांधींना यायला उशीर झाला असला तरी यापूर्वी त्याठिकाणी आलेल्या नेत्यांना त्यांची दखल घ्यावी लागणार हे नक्की.शेतकर्‍यांच्या या आंदोलनातला राहुल गांधींचा सहभाग म्हणजे पुढच्या वर्षी होणार्‍या उत्तरप्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मायावतींना दिलेलं आव्हान असल्याचं बोललं जातंय.

close