फी वाढीविरोधात लढणार्‍या पालकांच्या मुलांना शाळेतूनच काढले

May 11, 2011 10:41 AM0 commentsViews: 2

11 मे

अवाजवी फी आकारणी विरोधात लढणार्‍या पालकांच्या घरी मुलांना शाळेतून काढून टाकण्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. इतकंच नाही तर मुलांच्या शाळेचे दाखलेही परस्पर मुलांच्या घरी पाठवण्यात आले आहे. फी स्ट्रक्चर जाहीर करण्याची मागणी करणार्‍या पालकांच्या मुलांनाच शाळेतून बेकायदेशीरपणे काढून टाकण्यात आलंय.

गेल्या दीड वर्षापासून न्यू ईरा इंग्लिश स्कूलचे पालक अवाजवी फी आकारणीच्या विरोधात लढा देत आहेत. सुरुवातीला शाळा सीबीएससी बोर्डाची असल्याचे पालकांना सांगण्यात आलं होतं आणि त्यानुसार फी आकारणी करण्यात आली होती. दरम्यान सीबीएससी बोर्डाने परवानगी नाकारल्याने एसएससी बोर्डाचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला.

मात्र फी सीबीएससी बोर्डाचीच ठेवण्यात आली. या विरोधात लढणार्‍या पालकांना न्याय मिळवून देण्याऐवजी महापालिकेच्या शिक्षण विभागाने गुन्हे दाखल केले. महापालिकेचे शिक्षण प्रशासक आणि राज्यशासनाचे शिक्षण उपसंचालक यांनीसुद्धा याबाबत हात वर केले आहेत.

close