राधाकृष्णन शाळेच्या फीवाढीविरोधात पालक संघटित

May 11, 2011 3:49 PM0 commentsViews: 4

11 मे

मुंबईतील मालाड सुंदरनगरमधल्या सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेच्या पालकांनी फीवाढीला जोरदार विरोध केला. सलग तिसर्‍या वर्षी शाळेने केलेली मनमानी फीवाढ मान्य करणार नाही असा इशारा पालकांनी दिला. शाळेचं व्यवस्थापन पालकांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद द्यायला तयार नाही तरीही पालकांना कायदेशीर मार्गाने लढा द्यायचा निर्णय घेतला आहे.

अनेक मध्यमवर्गीय पालक सततच्या फीवाढीला कंटाळले आहे. दरवर्षी सक्तीने बदलले जाणारे मुलांचे युनिफॉर्म, पीटीचे निराळे युनिफॉर्म, महागड्या फील्ड पिकनिक आणि स्कूल बसवरचा खर्च हा तर फीव्यतिरीक्त पालकांचा होणारा खर्च आहे. संघटित पालकांनी खाजगी शाळांच्या मनमानीला चोख उत्तर दिलंय. आता या नफेखोरीविरोधात सरकार आश्वासन दिल्याप्रमाणे कारवाई करणार का ? आणि कधी करणार? याची पालक वाट पाहत आहे.

close