मालेगाव बॉम्बस्फोटातील दोन आरोपी फरार घोषित

November 10, 2008 4:33 PM0 commentsViews: 5

10 नोव्हेंबर,नाशिक दीप्ती राऊतमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी रामजी आणि संदीप डांगे यांना फरारी घोषित करण्यात आलं आहे. यातल्या 54 आरोपींना स्फोटकं तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. या स्फोटातले आणखी आरोपी राहिलकर आणि धावडे यांच्याकडून स्फोटांसाठी पैसा कुठून आला, याविषयीची माहिती घ्यायची आहे. त्यामुळे सरकारी पक्षानं या दोघांना आणखी पोलीस कोठडी द्यावी, याची मागणी केली. समीर आणि रमेशचंद्र उपाध्यायच्या पोलीस कोठडीची गरज नाही, असं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं. त्यांना न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी त्यांनी कोर्टाकडे केली.2003 ते 2008 च्या कालावधीत बीड, जालना, परभणी, पूर्णामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांना आहे. याबाबत औरंगाबाद, जालना आणि परभणी पोलिसांनी कोर्टात अर्ज दाखल केले आहेत. औरंगाबाद पोलिसांच्या विनंती अर्जानुसार कोर्टानं आरोपी अजय धावडेचा ताबा दिला आहे.उर्वरित आरोपींना 17 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. कोर्टात सरकारी वकिलांनी आज नवी माहिती सादर केली. 'अभिनव भारत ' चा खजिनदार अजय राहिलकरनं पुरोहितच्या सांगण्यावरुन समीर कुलकर्णी, राकेश आणि स्वत: पुरोहिताला 15 ते 20 लाख रुपये ट्रॉन्सफर केल्याचं कोर्टात सांगितलं.याबाबत एटीएसचा तपास सुरू आहे.

close