पोलीस कोठडीत एका पारधी तरुणाचा मृत्यू

May 11, 2011 1:44 PM0 commentsViews: 5

11 मे

वाशीममध्ये पोलीस कोठडीत पारधी तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे तणाव वाढला आहे. रिसोडमध्ये झालेल्या एका चोरीनंतर दोन पारधी तरुणांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आलं होत. पहाटे 4 वाजता घरातून या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जागेवरच पोलिसांनी जबर मारहाण केली. त्यानंतर रिसोड पोलीस स्टेशनमध्ये या तरुणांना नेण्यात आलं.

महत्वाच म्हणजे या दोघांवर कोणताच गुन्हा पोलिसांनी दाखल केला नव्हता. या मारहाणीत भेगा पवार या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेला तब्बल 36 तास उलटून गेल्यानंतरही आरोपीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला नाही. प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. मात्र अजूनही कोणत्याही पोलिसांवर गुन्हा दाखल झालेला नाही. दुसर्‍या तरुणाला वाशीमच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान आज मृतदेह ताब्यात मिळावा यासाठी मृतकाच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या आंदोलन केलं.

close