शिवसेनेच्या आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की

May 11, 2011 3:56 PM0 commentsViews: 6

11 मे

राज्य शिखर बँकेतील घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेनं आजपासून अलिबागमधून राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री अजित पवारसह संचालक मंडळावर असणार्‍या मंत्र्यानी राजीनामे द्यावे अशी मागणी करत शिवसैनिकांनी अलिबागच्या रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मात्र या दरम्यान पोलीस आणि मोर्चेकर्‍यांमध्ये धक्काबुक्की झाल्याने काही काळ तणावाचं वातावरण होतं. मात्र पोलिसांनी नमती भूमिका घेतल्याने तणाव निवळला.

close