सिंधुदुर्गातील टाळंबा धरणग्रस्त वार्‍यावर ; 20 वर्षांपासून रखडले पुनर्वसन

May 11, 2011 2:27 PM0 commentsViews: 17

11 मे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या टाळंबा पाटबंधारे प्रकल्पाचे काम धरणग्रस्तांच्या प्रश्नांची तड न लावताच पुढे रेटण्यात येतोय. सरकारने गेल्या वीस वर्षात प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी एकही भूखंड संपादीत केलेला नाही. शिवाय बुडीतक्षेत्रात येणार्‍या गावांचे जमीन हक्कांसंबंधातील अनेक प्रश्नही सुटलेले नाहीत. अशा परिस्थितीत धरण झाल्यानंतर जायचं कुठे आणि खायचं काय हा गंभीर प्रश्न गावकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या टाळंबा या 10 टीएमसी क्षमतेच्या पाटबंधारे प्रकल्पात कुडाळ तालुक्यातल्या सात गावांमधली 3500 कुटुंब विस्थापित होत आहेत.

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या

- आकारीपड जमिनीचे मालकी हक्क – वनसंज्ञेच्या प्रश्नाचा निकाल- धरणग्रस्तांकडून पुनर्वसनासाठी 65 टक्के रक्कम – जमिनीच्या हक्कांसंबंधात खातेफोड प्रक्रिया- पुनर्वसनासाठी भूसंपादनाबाबत एक गाव एक प्रस्ताव – 48/2 खाली शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळावी

close