एआयईईईच्या पुन:परीक्षेला 80 विद्यार्थी मुकले

May 11, 2011 4:12 PM0 commentsViews: 2

11 मे

1 मे रोजी पेपर फुटल्यामुळे एआयईईईची परीक्षा त्या दिवशी देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन:परीक्षा 11 मे रोजी घेण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांनी री रजिस्ट्रेशन पण केलं होतं. पण पुण्यात जेव्हा आज सकाळी विद्यार्थी आपापल्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा देण्यास गेले तेव्हा त्याना सांगण्यात आलं की परीक्षेकरता औंध येथील कॉलेज हे एकमेव सेंटर आहे.

या गोंधळामुळे सुमारे 70 ते 80 विद्यार्थी नियोजित परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचू न शकल्याने परीक्षेला बसू शकले नाहीत. नाराज झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रातील बदलाची माहिती न दिल्याबद्दल प्रशासनाला दोष दिला. 1 मे रोजी पेपर फुटल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली.आता पुन्हा नव्या घोळामुळे काही विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला.

close