एकनाथ खडसेंचे जावई पंकज बोरोलेंचा अटकपूर्व जामीन नाकारला

May 11, 2011 5:54 PM0 commentsViews: 3

11 मे

जळगावमधील तापी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले यांच्यासह त्यांचा मुलगा पंकज बोरोले यांची अटक पूर्व जामीन याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळली. त्यामुळे त्यांची अटक आता अटळ आहे. 55 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पंकज बोरोले हे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. सुरेश बोरोले हे खडसे यांचे व्याही आहेत. भ्रष्टाचार प्र्रकरणी सुरेश आणि पंकज बोरोले यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हाही दाखल आहे. ठेवी परत न देणे, खोटी कागदपत्रं तयार करणे, अशा अनेक तक्रारी आत्तापर्यंत या पतसंस्थेविरोधात आल्या होत्या. पण सहकार खात्याने ठेवीदारांच्या कुठल्याही तक्रारदारींची दखल घेतली नाही.

close