पुण्यातल्या गुळुंचे गावची काटेबारस यात्रा

November 10, 2008 1:36 PM0 commentsViews: 16

10 नोव्हेंबर पुणेकाटा पायात रुतल्यावर आपल्याला असह्य वेदना होतात. पण स्वत:हून काट्यांच्या ढिगात कुणी झोकून देत असेल तर…विश्वास बसणार नाही पण पुणे जिल्ह्यातील गुळुंचे गावच्या काटेबारस यात्रेत अशी अंगावर शहारे आणणारी दृश्ये पाहायला मिळतात. बाभळीच्या काट्यांचे ढीगच्या ढीग रचून त्यावर पाण्यात सूर मारावा त्याप्रमाणं लोक काट्यामध्ये उड्या मारतात. हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या ज्योतिर्लिंगाच्या या यात्रेत परंपरेनुसार देवाची पालखीतून मिरवणूक काढली जाते. मंदिराजवळच्या मोकळ्या जागेत बाभळीच्या काट्यांचे थर रचले जातात. या बाभळीच्या ढीगाला पालखी पाच प्रदक्षिणा घालते आणि गुलालानं माखलेले भाविक हरहर महादेवच्या गजरात या काट्यांच्या ढिगात स्वत:ला झोकून देतात.

close