राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन

May 12, 2011 10:04 AM0 commentsViews: 1

12 मे

पुण्यात काँग्रेस महासचिव राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. अलका टॉकी चौकात निदर्शन करण्यात आली. शेतकर्‍यांच्या आंदोलनामध्ये राहुल गांधी सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यांना अटक करायचं कारण काय असा प्रश्न उपस्थित करत पुणे शहर काँग्रेसने मायावती सरकारचा निषेध केला.

close