राजनाथ सिंग आणि जेटली पोलिसांच्या ताब्यात

May 12, 2011 10:09 AM0 commentsViews: 6

12 मे

राहुल गांधी यांच्या अटकेनंतर गाझियाबादमध्ये भाजप नेते राजनाथ सिंग आणि अरूण जेटलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राहुल गांधींनंतर बीजेपीनेही शेतकर्‍यांच्या या आंदोलनात उडी घेतली. शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ भाजपचे जेष्ठ नेते राजनाथ सिंग गाझियाबादमध्ये उपोषणाला बसले होते. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान गाझियाबादच्या खासदारांनी भट्ट परसोल गावात जाण्याचा प्रयत्न केला होता पण मायावती सरकारने मात्र त्यांना तिथे जाण्यापासून रोखलं.

close