अनधिकृत झोपड्यावर कारवाईत पोलिसांवर दगडफेक

May 12, 2011 10:14 AM0 commentsViews: 8

12 मे

पुण्यात कात्रज भागात अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करत असताना नागरिकांनी विरोध केल्यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. कात्रज परिसरातल्या वाघजाई परिसरात ही घटना घडली. झोपड्या तोडताना नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्ज केला. त्यामुळे मुंबई-पुणे कात्रज हायवेवर नागरिकांनी रास्ता रोको केला. या रास्ता रोकोमुळे इथली वाहतुकही काही काळ विस्कळीत झाली होती.

close