बाळंत महिलांना फिनाईल पाजणारी कक्षसेविका निलंबित

May 12, 2011 10:45 AM0 commentsViews: 6

12 मे

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात झालेल्या हलगर्जीपणा प्रकरणी चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. शोभा इंगळे या कक्षसेविकेला या प्रकरणी निलंबित करण्यात आलंय. 2 नर्सना निलंबित करण्याची मागणी सिव्हिल सर्जन यांनी उपसंचालकांकडे केली आहे. बेबी चेन्नाम आणि वैशाली गायकवाड अशी या नर्सची नावं आहेत. दरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉ. ए. आर. साळूंखे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

अमरावतीतल्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये हलगर्जीपणाचा कळस झाला आहे. जिल्हा रुग्णालयात प्रसूती झालेल्या 7 महिलांना टॉनिक समजून फिनाईल पाजण्यात आलंय. यामुळे 7 महिलांना विषबाधा झाली. त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे. नर्सेसनी आज डोज स्वत: न देता एका महिला सफाई कर्मचार्‍याकडे हे काम सोपवल होतं.

यातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार या महिलांनी केली मात्र तरीही या सफाई कामगाराने फिनाईल पिण्यास भाग पाडलं. हे सर्व झाल्यानंतर संबधितांवर कारवाई झालेली नाही. रुग्णालय प्रशासन हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वीही या रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अनेकदा या हॉस्पिटलची तोडफोडही झाली आहे.

close