अंध मुलांच्या क्रीडा स्पर्धा जळगावात सुरू

November 10, 2008 4:40 PM0 commentsViews: 5

10 नोव्हेंबर जळगावप्रशांत बागअंधांसाठीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा जळगावात सुरू झाल्या आहेत. दोन गटांत होणा-या या स्पर्धेत राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातून साडेसातशे खेळाडूंनी सहभाग घेत आहेत. समाजातील दुर्लक्षित मुलासांठी काम करणा-या नॅब या संस्थेनं ही स्पर्धा आयोजित केली आहे. महाराष्ट्रातील अंधांच्या शाळांनी या विद्यार्थ्यांची विशेष तयारी करून घेतली. या स्पर्धेत तीनशे सोळा मुली आणि चारशे तीस मुलांनी भाग घेतला आहे.

close