सरकारमध्ये राहायचा विचार करावा राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी !

May 12, 2011 12:44 PM0 commentsViews: 3

12 मे

शिखर बँकेवर झालेल्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज मुंबईत बैठक सुरू आहे. या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर टीका करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास सरकारमध्ये राहायचा विचार करावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली आहे. पण याबाबत ज्येष्ठ नेते भूमिका मांडतील, इतरांनी बोलू नये अशी सूचना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी केली.

येत्या 12 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक सुरू आहे. पण राज्य सहकारी बँकेवरच्या कारवाईचे पडसाद आजच्या बैठकीत उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान एरवी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मीडियाला येण्याची परवनागी देण्यात येते. पण आज पक्षाने मीडियाला बाहेरच ठेवलंय.

close