पुण्यातील सातवीपर्यंतच्या 36 शाळा दहावीपर्यंत होणार

May 12, 2011 4:45 PM0 commentsViews: 5

12 मे

पुण्याच्या शिक्षण मंडळाच्या तब्बल 36 इंग्रजी शाळा बेकायदेशीर रित्या चालवल्याची बाब उघड झाली होती. या शाळांमधून बाहेर पडलेल्या एकुण 200 विद्यार्थ्यांना इतर खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळत नव्हता. मात्र आता महापालिकेनेच यावर उपाय शोधत यंदाच्या वर्षापासुन आठवीचे दोन वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी एक असं करत 10 वी पर्यंतची शाळा चालवली जाणार आहे. महापालिका आणि शिक्षण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याबरोबरच या शाळेसाठी लागणारा निधी महापालिका उपलब्ध करुन देईल. पण शाळांना लागणारे शिक्षण आणि इतर सुविधांसाठी कॉर्पोरेट सेक्टर ने पुढे यावं असं आवाहनही स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बिडकर यांनी यावेळी केलं.

close