चेन्नईचा दिल्लीवर 18 धावांनी विजय

May 12, 2011 6:12 PM0 commentsViews: 6

12 मे

आयपीएलच्या गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या हंगामातही आपली विजयी कामगिरी सुरुच ठेवली आहे. चेन्नईने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 18 रन्सने पराभव करत पॉईंटटेबलमध्ये थेट अव्वल क्रमांकावर झेप घेतली. एस बद्रीनाथची हाफ सेंच्युरी आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर पहिली बॅटिंग करणर्‍या चेन्नईने 176 रन्सचा बलाढ्य स्कोर उभा केला. याला उत्तर देताना दिल्ली डेअरडेव्हिल्सने चांगली लढत दिली. पण त्यांना 6 विकेट गमावत 158 रन्स करता आले. इरफान पठाणने फटेकाबाजी करत नॉटआऊट 44 रन्स केले. पण टीमचा पराभव तो टाळू शकला नाही. दिल्लीचा 12 मॅचमधला हा आठवा पराभव ठरला आणि स्पर्धेतील स्थानही संपुष्टात आलं.

close