राहुल गांधी परिपक्व लोकनेते ?

May 12, 2011 4:54 PM0 commentsViews: 6

12 मेराहुल गांधी सक्रीय राजकारणात येऊन आता सात वर्षं होत आली आहे. आतापर्यंत त्यांनी देशभरात जवळपास सर्व राज्यात दौरे केले आहे. सर्वांत जास्त दौरे उत्तर प्रदेशात केलेत. पण विरोधक अजूनही त्यांना 'जमीन से जुडा' राजकारणी मानायला तयार नाही. राहुल गांधी खरंच एक परिपक्व, लोकनेते झालेत का?

1987 सालच्या बेलची आंदोलन. बिहारमधल्या बेलची गावात दलितांचा संहार झाला होता. तेव्हा सत्ता हातातून गेलेल्या इंदिरा गांधी हत्तीवर बसून या गावात गेल्या आणि काही वर्षांतच पुन्हा सत्तेत आल्या.

उत्तर प्रदेशात काँग्रेसचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी राहुलने अनेक प्रयत्न केले. 2008 साली ते इटावा जिल्ह्यात दलिताच्या घरी राहिला. 2010 साली ते अलिगढ जवळच्या टप्पलमधल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. नंतर त्यांनी बांदामध्ये मोठी सभा घेत बुंदेलखंडसाठी विशेष पॅकेजची मागणी केली होती. आणि काँग्रेसचा आम आदमीचा नारा उत्तर प्रदेशात नेण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधींना उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत काही प्रमाणात यश मिळालं. पण प्रत्येक ठिकाणी ते यशस्वी झालेच असं नाही. बिहारवर त्यांनी वर्षभर लक्ष केंदि्रत केलं. एकट्यानं लढण्याची रणनिती आखली. पण पक्षाच्या पदरी फक्त चार जागा आल्या. 2जी घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, अण्णांची भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी मौन बाळगलं. अलिकडेच केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या वयावर केलेली टीका त्यांची अपरिपक्वता दाखवते.

पुढच्या वर्षी होणार्‍या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका ही राहुल गांधींची खरी कसोटी असेल. मायावती, राजनाथ सिंग, मुलायम सिंग यांच्यासारख्या मुरब्बी नेत्यांना धूळ चारणं हे त्यांचं खरं आव्हान आहे. हे जर ते पेलू शकले तरच ते खरे लोकनेते म्हणून प्रस्थापित होतील. नसता एक दिवसासाठी येऊन फोटो काढून घेणारा नेता अशी विरोधकांची टीका त्यांना पुढेही सहन करावी लागेल.

close