बँक प्रकरणी सर्वांची चौकशी करावी – अजित पवार

May 13, 2011 9:23 AM0 commentsViews: 2

13 मे

राज्य सहकारी बँक प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. या बँकेवर नेमलेल्या प्रशासकांनी पक्षभेद न करता सगळ्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. एमएससी बँक बरखास्त होण्यामागे फक्त राष्ट्रवादीच जबाबदार आहे असा प्रचार होत आहे.

लोकांना वस्तुस्थिती समजावी यासाठीच काँग्रेसच्या नेत्यांची नावं आपण सांगितली असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी पुण्यात दिले. एमएससी बँक बरखास्त होण्यामागे केवळ राष्ट्रवादीच नाही. तर काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या काही बँकाची किती थकबाकी आहे हे काल मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांनी उदाहरणांसह सांगितलं होतं.

close