अफगाणिस्तानाला भारताकडून 50 कोटी डॉलर्सच्या मदत

May 12, 2011 5:12 PM0 commentsViews: 2

12 मे

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मनमोहन सिंग अफगाणिस्तानच्या दौर्‍यावर गेलेत. आज त्यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांची भेट घेतली. अफगाणिस्तानला सर्वप्रकारे मदत करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे असं आश्वासन त्यांनी करझाई यांना दिलं.

अफगाणिस्तानच्या खडतर काळातसुद्धा भारत साथ सोडणार नाही अशी हमी त्यांनी दिली.ओसामाला ठार केल्यानंतर आता अफगाणिस्तानातून आपलं सैन्य काढून घेण्याचा विचार अमेरिका करतेय. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अफगाणिस्तानच्या दौर्‍याला महत्त्व आहे. अफगाणिस्तानला 50 कोटी डॉलर्सची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली.

close