विंडीज दौर्‍यासाठी टीमची धुरा गौतम गंभीरकडे

May 13, 2011 10:28 AM0 commentsViews: 1

12 मे

आगामी वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी भारतीय टीमची निवड आज करण्यात आली. महत्वाचे म्हणजे ओपनिंग बॅट्समन गौतम गंभीरवर कॅप्टनपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवाय विनय कुमार, प्रवीण कुमार, अमित मिश्रा आणि बद्रीनाथ यांना टीममध्ये जागा मिळाली आहे. महेंद्र सिंग धोणी, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खान यांना वन डे सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. पण त्यानंतरच्या टेस्ट सीरिजसाठी हे सगळे टीममध्ये परततील असं बीसीसीआयने स्पष्ट केलंय. धोणीच्या अनुपस्थितीत पार्थिव पटेल आणि वृद्धीमान साहा या विकेट कीपरना पसंती देण्यात आली आहे. वर्ल्ड कप विजेत्या टीममधून एस श्रीशांत आणि पियुष चावला यांना वगळण्यात आलंय. निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी चेन्नईत भारतीय टीम जाहीर केली. टीमचे नवे कोच डंकन फ्लेचरही यावेळी उपस्थित होते.

भारतीय टीम

गौतम गंभीर (कॅ), सुरेश रैना, पार्थिव पटेल, विराट कोहली, युवराज सिंग, एस बदि्रनाथ, रोहीत शर्मा, हरभजन सिंग, आर अश्विन, प्रवीण कुमार, ईशांत शर्मा, मुनाफ पटेल, विनय कुमार, युसुफ पठाण, अमित मिश्रा आणि वृद्धीमान साहा

close