शेन वॉर्नविरोधात तक्रार दाखल

May 12, 2011 5:32 PM0 commentsViews: 6

12 मे

शेवटची आयपीएल खेळणारा शेन वॉर्न सध्या मैदानाबाहेरच्या वादामुळे गाजतोय. यावेळी त्याच्या वागणुकीबाबत आक्षेप घेण्यात आला आहे. गेल्या मॅचमधल्या पराभवानंतर शेन वॉर्नची वागणूक योग्य नव्हती असा आरोप राजस्थान क्रिकेट असोसिएशनने केला. वॉर्नच्या विरोधात आरसीएने तक्रार दाखल केली आहे. मॅचच्या पारितोषिक वितरणावेळी वॉर्ननं आरसीएचे सचिव संजय दीक्षित यांच्याबद्दल अपशब्द काढल्याचे आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आलेत. वॉर्नवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणीही आरसीएने केली.

close