जगमोहन रेड्डी 5 लाख 12 हजार विक्रमी मतांनी विजयी

May 13, 2011 11:12 AM0 commentsViews: 12

13 मे

आंध्र प्रदेश लोकसभा पोटनिवडणूक कड्डपा मतदारसंघातून जगमोहन रेड्डी 5 लाख 12 हजार रेकॉर्ड मतांनी ते विजयी झाले आहेत. याआधी सर्वाधिक मताने विजयी होण्याचा रेकॉर्ड राम विलास पासवान यांच्या नावावर होता.

1977 मध्ये हाजीपूर मतदारसंघातून त्यांनी 5.05 लाख मताने विजय मिळवला होता. मात्र दिवंगत राजशेखर रेड्डी यांच्या मुलगा जगनमोहन रेड्डी याने 5 लाख 12 हजार मते घेतली आहे. त्यामुळे भारताच्या निवडणूक इतिहासात सर्वात जास्त मताधिक्याने विजयी होण्याचा बहूमान आता जगनमोहन रेड्डी यांच्याकडे जाणार आहे.

राजशेखर यांच्या मृत्यूनंतर डिसेंबर 2009 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजयालक्ष्मी बिनविरोध निवडून आल्या होत्या. पक्षश्रेष्ठींशी झालेल्या वादानंतर जगनमोहन आणि विजयालक्ष्मी गेल्या नोव्हेंबरमध्ये काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यांनी खासदारकी आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याने याठिकाणी पोटनिवडणुका झाल्या. जगनमोहन यांनी मार्चमध्ये वायएसआर काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.

close