राज्यात ही असा बदल होऊ शकतो – शिवसेनाप्रमुख

May 13, 2011 12:31 PM0 commentsViews: 2

13 मे

पश्चिम बंगालमध्ये तब्बल तीन दशकांच्या सत्तेला ममता बॅनर्जी यांनी सुरूंग लावला आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली. तर दुसरीकडे तामिळनाडूत करुणानिधींचा पराभव करून जयललिता निर्विवाद विजय मिळवला आहे. या निकालावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.

'तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या निकालाने बदलाची एक आशा दाखवलीय. महाराष्ट्रातसुद्धाअसाच बदल होऊ शकतो. हे निकाल शिवशक्ती-भीमशक्तीसाठी शुभसंकेत आहेत' – बाळासाहेब ठाकरे

close