नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून 10 जणांना अटक

May 13, 2011 2:51 PM0 commentsViews: 2

13 मे

नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याच्या संशयावरून पुण्यातून 10 जणांना अटक करण्यात आली आहे. एटीएसनं ही कारवाई केली आहे.कोर्टात हजर केलं. त्यांना 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याअगोदर 30 एप्रिलला एटीएसच्या पथकाने पुणे आणि नाशकातून चार नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती. यामध्ये 3 महिला आणि एका पुरूषाचा समावेश होता. यापैकी 3 महिलांना पुण्यातून अटक करण्यात आली होती. तर नक्षवाद्यांच्या गटाची प्रमुख कविता सोनटक्के उर्फ अँजेला उर्फ इसकारा हीला ठाण्यातून अटक करण्यात आली होती.

कविता सोनटक्के उर्फ अँजेला उर्फ इसकारा ही गोल्डन कॉरिडॉर कमिटीची सेक्रेटरी आहे. नक्षलवादी चळवळीसाठी सक्रिय असलेली अँजेलाचे छायाचित्र आत्तापर्यंत उपलब्ध होत नव्हतं.पण आयबीएन लोकमतच्या हाती तीच छायाचित्र हाती लागले आहे.

कविता सोनटक्केचा 1994 सालात घरदार सोडून कविता नक्षल चळवळीत सहभागी झाली. आणि त्यानंतर ती कविताची ऍंजेला उर्फ इसकारा झाली. ऍंजेला हीच्या विरोधात 20 गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. हे गुन्हे पोलिसांची हत्या करणे, पोलिसांच्या खबर्‍यांचा हत्या करणे, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, पोलिसांवर हल्ले करणे, सुरंग स्फोट करणे असे गुन्हे आहेत. नक्षलवादी चळवळीचा प्रमुख मिलिंद तेलतुबडे हा आहे. ऍंजेला ही त्याची बायको आहे. ऍंजेलाने सध्या पुण्यात नक्षलवादी चळवळीचं मुख्यालय बनवल होतं. आणि त्या चळवळीमध्ये तरूणांची भरती करत होती.

close