बँकेवरील कारवाईत राजकारण नाही – शरद पवार

May 15, 2011 11:55 AM0 commentsViews: 5

15 मे

महाराष्ट्र राज्य शिखर बँकेचे संचालक मंडळ बरखास्त होण्यात कोणतही राजकारण नाही असा निर्वाळा केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

शिखर बँकेतील ठेवी आणि कर्जाबाबत घोळही नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. रत्नागिरीतल्या गणपतीपुळे इथं राष्ट्रवादीच्या युवक विभागाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पवार यांनी आपल मत व्यक्त केलं.

तर दुसरीकडे मागिल आठवड्यात महाराष्ट्र राज्य शिखर बँकेच्या कारवाईवरून आघाडीत चांगलाच वाद रंगला होता. बँकेवरील कारवाई दिल्ली दरबारातून झाली अशी टीका अजित पवारांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बँक ही कोणत्याही पक्षाच्या मालकी नाही अशा शब्दात राष्ट्रवादीच नाव न घेता टोला हाणला होता.

तर अलीकडेच झालेल्या राष्ट्रवादीची मुंबईत झालेली बैठकीत अजितदादांनी काँग्रेसच्या काही नेत्यांनी बँकेच कर्ज बुडवल्याचा नावानिशी खुलासा केला होता. आता शरद पवारांनी शिखर बँकेचे संचालक मंडळ बरखास्त होण्यात कोणतही राजकारण नाही असा निर्वाळा केल्यामुळे संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.