पेट्रोल 5 रुपयांनी महागले

May 15, 2011 10:11 AM0 commentsViews: 4

15 मे

पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर लगेचच केंद्र सरकारने जनतेला धक्का दिला आहे. पेट्रोलचे दर पाच रुपयांनी वाढवण्याची घोषणा तेल कंपन्यांनी केली आहे. मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झाली आहे.

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम याकंपन्यानी पेट्रोलच्या दरात 4 रुपये 99 पैसे ते 5 रुपये 1 पैशांच्या दरम्यान वाढ केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलचे दर 9 रुपये 50 पैसे ते 10 रुपये दरम्यान वाढल्यामुळे ही दरवाढ केल्याचे तेल कंपन्यानी सांगितलं. गेल्या नऊ महिन्यातील ही नववी दरवाढ आहे. यापूर्वीची दरवाढ 16 डिसेंबर 2010 रोजी झाली होती.

पूर्वी पेट्रोलचे दर काय होते आणि आता त्यात कितीने वाढ झाली. पेट्रोल पुन्हा भडकले !

शहर जुना दर नवा दर

दिल्ली 58.37 रु. 63.37 रु. मुंबई 63.08 रु. 68.08 रु. नागपूर 66.40 रु. 71.40 रु.नाशिक 62.94 रु. 67.94 रु.पुणे 63.18 रु. 68.18 रु.

close