गुजरातमधल्या नॅनो प्रकल्पाचं काम सुरू

November 10, 2008 5:48 PM0 commentsViews: 2

10 नोव्हेंबर गुजरातटाटा मोटर्सच्या गुजरातमधल्या नॅनो प्रकल्पाचं काम सुरू झालंय. सध्या या कारखान्यामध्ये कॉम्पाउण्ड बांधलं जातंय. गुजरातमधल्या साणंद इथं हा नॅनोचा प्रकल्प उभा राहतोय. सात ऑक्टोबरला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि रतन टाटा यांनी नॅनो प्रकल्पासाठी करारवर स्वाक्ष-या केल्या होत्या. त्यानंतरच आता साणंदमध्ये अंदाजे दोन हजार कोटींच्या या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. गुजरात सरकारनं याआधीच टाटा मोटर्सच्या या नॅनो प्रकल्पासाठी आवश्यक ती मदत देण्याचं जाहीर केलं आहे.

close