शिवशक्ती-भिमशक्तीचा एकत्रित मेळावासाठी बैठक संपन्न

May 15, 2011 11:17 AM0 commentsViews: 2

15 मे

शिवसेनेचे आमदार, जिल्हाप्रमुख आणि विभागप्रमुखांची एक बैठक दुपारी शिवसेनाभवनात पार पडली. शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी या बैठकीला मार्गदर्शन केलं. 9 जूनला शिवशक्ती-भिमशक्तीचा जो एकत्रित मेळावा होणार आहे.

त्याच्या पुर्वतयारीसाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. महागाई आणि सरकारी पातळीवरचा भ्रष्टाचार या दोन प्रमुख मुद्यावर शिवसेना, भाजप आणि आरपीआय युतीतर्फे सरकारच्या विरोधात या मेळाव्याच्या माध्यमातून रणशिंग फुंकण्यात येणार आहे. त्यादृष्टीने शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना आज या बैठकीत निर्देश देण्यात आले.

close