पुण्यात जपानी फुड फेस्टिव्हलचे आयोजन

May 15, 2011 11:35 AM0 commentsViews: 1

15 मे

खवय्ये पुणेकरांसाठी पुण्यातील सयाजी हॉटेलमध्ये जापनीज फुड फेस्टिव्हलचे आयोजन करणायत आलं आहे. जापानमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या सुशी, साताय, आणि थाई हे खाद्य पदार्थ या फेस्टिव्हलचं खास आकर्षण ठरत आहे. 13 ते 22 मे दरम्यान हे फेस्टिव्हल सर्वांसाठी खुलं असणार आहे. या जापनीज पदार्थांचा मनमुराद स्वाद घेण्यासाठी पुणेकरांनीही मोठी गर्दी केली आहे.

जपानी मेजवानीच आमंत्रण देणार्‍या सुशी आणई साताय फुड फेस्टिव्हल पुण्यातील सयाजी हॉटेल मध्ये सुरवात झाली. सलाड, सुप आणि थाई करीज सोबत इथं ठेवलेला शुशी पदार्थ बघितल्या नंतर तोंडाला पाणी सुटल्या शिवाय राहत नाही, नेहमी महाराष्ट्रीयन जेवनाचा आस्वाद घेणार्‍यांसाठी तर या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हे फेस्टिव्हल म्हणजे संधी आहे. पुण्यातील वाकड भागात असलेल्या या जापनीज पदार्थांचा मनमुराद स्वाद घेण्यासाठी पुणेकरांनीही मोठी गर्दी केली.

close