जैन मुनी सागर महाराज यांच्या अटकेच्या निषेधार्थ मोर्चा

May 15, 2011 3:42 PM0 commentsViews: 3

15 मे

उत्तर प्रदेश सरकारने जैन मुनी सागर महाराज यांना अटक करुन त्यांच्यावर अन्याय केल्याच्या विरोधात आज सकाळी मालाड इथं आंदोलन करण्यात आलं.

उत्तरप्रदेश सरकारच्या विरोधात जैन सांप्रदायाच्या एक हजार नागरिकांनी निषेध मोर्चा काढला. आणि मायावती सरकारचा निषेध केला. गोहत्येच्या विरोधात उत्तर प्रदेश येथील मेरट येथे जैन मुनी सागर महाराज आंदोलन करत होते. यावेळी जैन मुनींना उत्तर प्रदेश पोलिसांनी रात्री अटक केली. त्याविरोधात मुंबईतील जैन समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटलीय.

close