प्रसाद पुरोहितनेच आरडीएक्सचा पुरवठा केला

November 10, 2008 5:54 PM0 commentsViews: 2

10 नोव्हेंबर, नाशिक निरंजन टकलेमालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी प्रसाद पुरोहित याच्या भोवतीचा फास आता पुरता आवळला गेलाय. या पुरोहितने आरडीएक्सचा पुरवठा केल्याचं एटीएसच्या तपासात उघड झालंय. प्रसाद हा मिथुन चक्रवर्ती या नावानं ट्रेनिंग देत होता. रायगड, सिंहगड या भागात त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना बॉम्ब बनवायचं ट्रेनिंग दिलं. धावडेला त्याने चार पिस्तुलं आणि चार काडतुसं दिल्याचं उघड झालंय तर जगदीश म्हात्रेला त्याने दोन पिस्तुलं आणि 15 काडतुसं दिली. याकामासाठी लागणारा पैसा हवालामार्फत आणला गेल्याचंही म्हटलं जातंय. बंगलोरच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये पुरोहितची नार्काे टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग होणार आहे. पुरोहितला आरडीएक्स कसं उपलब्ध झालं ? त्याचा दहशतवाद गटाशी संबंध आहे का? हवालामार्फत पैसा कसा आला? याचा तपास एटीएस पथक करत आहेत.

close