आठवलेंचा युतीत प्रवेश ही पवारांची खेळी नाही – मुंडे

May 15, 2011 4:13 PM0 commentsViews: 4

15 मे

शिवसेना भाजपासोबत नव्यानेच आलेले रामदास आठवले आणि गोपीनाथ मुंडे हे आज परळीमध्ये एकत्र आले होते. आठवले सेना भाजपा सोबत जाण्याची खेळी पवारांचीच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पण गोपीनाथ मुंडेंनी मात्र याचा इन्कार केला.

पवारांनी केलेल्या खेळी मध्ये अडकावे एवढे आम्ही राजकारणात नवीन नाही असंही मुंडे म्हणाले. काँग्रेसने पवारांना चांगलेच वीक केल आहे त्यांच्या सहकारी बँकेवर कारवाई केल्यामुळे तर पवार पुरते बेजार झाले आहेत. अशा वेळी त्यांनी अशी खेळी करावी एवढा वेळ सुद्धा पवारांकडे नाही असा टोलाही मुंडेंनी लगावला.

close