काँग्रेसचे जयललितांना चहापानाचे आमंत्रण ; ममता एक्सप्रेसला ग्रीन सिंग्नल

May 15, 2011 4:38 PM0 commentsViews: 2

15 मे

तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्षाचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसने आता आपला मोर्चा अण्णा द्रमुककडे वळवला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जयललितांचे अभिनंदन केलंय आणि त्यांना चहापानाचे आमंत्रणही दिले आहे.

दरम्यान जयललिता यांनी राज्यपाल एस. एस. बर्नाला यांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला. जयललिता यांनी सोनिया गांधींचा आमंत्रणाच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

द्रमुकपासून फारकत घेण्याच्या राजकारणाची ही सुरुवात आहे का यावर चर्चा सुरू झाली आहे. जयललिता उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार आहेत.

ममता बॅनर्जी दिल्ली दरबारी रवाना

पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जींनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी शुक्रवारी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या तृणमूल काँग्रेसबरोबर सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेस श्रेष्ठींनी ग्रीन सिग्नल दिला आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी सोनियांची भेट घेण्यासाठी दिल्लीला निघाल्या आहे.

close