बँकेच्या कारवाईवरून आघाडीत तणाव गैरसमजातून – मुख्यमंत्री

May 15, 2011 5:11 PM0 commentsViews: 2

15 मे

राज्य सहकारी बँकेवर कारवाई झाली आणि आघाडीत बिघाडी सुरू झाली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपाला एक एक सुरूंग लागत गेला. मात्र आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सहकारी बँकेतून निर्माण झालेला तणाव हा गैरसमजातून झाला असल्याचे सांगितले. तसेच राज्य सहकारी बँकेबाबत आरबीआयने घेतलेला निर्णय मी शरद पवार यांना सांगितला असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाबळेश्वर इथं केला.

close