कोचीने उडवला राजस्थानचा धुव्वा

May 15, 2011 6:09 PM0 commentsViews: 1

15 मे

आयपीएलमध्ये आज रविवारी पंजाब विरूध्द दिल्ली आणि कोची विरूध्द राजस्थान या दोन्ही मॅच एकतर्फी झाल्या. पण कोची आणि राजस्थान दरम्यानची मॅच तर जेमतेम 26 ओव्हर चालली.

कोचीने आधी राजस्थानची टीम 97 रनवर ऑलआऊट केली. आणि हा स्कोअर सातव्याच ओव्हरमध्ये पार केला आणि तोही फक्त दोन विकेट गमावून. कोचीच्या विजयाचा हीरो ठरला तो ब्रॅड हॉज. बॉलिंग करताना त्याने चार ओव्हरमध्ये फक्त तेरा रन देत चार विकेट घेतल्या आणि राजस्थानच्या बॅटिंगचं कंबरडं मोडलं.

बॅट हातात आल्यावर 33 रन त्याने केले ते फक्त सतरा बॉलमध्ये. राजस्थानची टीम 97 रन्स मध्येच ऑलआऊट झाल्यावर खरंतर मॅचमधील रंगत कमी झाली होती. पण कोचीच्या बॅट्समननी प्रेक्षकांना सिक्सची मेजवानी देऊन खुश केलं. ब्रँडन मॅक्युलमने 29 रन करताना चार सिक्स ठोकले.

तर पार्थिव पटेलने एक आणि हॉजने दोन सिक्स ठोकले. राजस्थानची टीम आज पूर्णत: निष्प्रभ ठरली. ठराविक अंतराने विकेट जात राहिल्यामुळे टीम अखेर शंभर रनचा टप्पाही नाही गाठू शकली. हायएस्ट स्कोअर केला तो अशोक मनेरियाने 27 बॉलमध्ये त्याने 31 रन केले.

close