राज्यात उन्हाचा तडाखा ; चंद्रपूरचा पारा 46 वर

May 16, 2011 9:54 AM0 commentsViews: 1

16 मे

उन्हाचा तडाखा आता राज्यात सगळीकडेच जाणवतोय. पण चंद्रपूर शहरात तर तापमान 46 डिग्रीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. दुपारी 12 पासूनच शहरातील रस्ते आणि उद्याने ओस पडायला लागतात. दुपारी 12 ते 4 पर्यंत शहरात कर्फ्यू लागल्यासारखी स्थिती असते. वाढत्या तापमानामुळे रक्तस्त्राव आणि डोकेदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारीही वाढत चालल्यात आहेत.

गेल्या 24 तासात महाराष्ट्रातील शहरांचे सरासरी तापमान

नागपूर – 44सोलापूर – 42जळगाव – 43चंद्रपूर – 46औरंगाबाद – 39 पुणे – 37

close