नाशिक हायवेवर सफरचंदाच्या ट्रकला अपघात

November 10, 2008 5:56 PM0 commentsViews: 3

10 नोव्हेंबर भिंवडीमुंबई- नाशिक हायवेवर सफरचंदानं भरलेल्या एका ट्रकला अपघात झाला. भिवंडीजवळच्या अंजूर-दिवे गावाजवळ ही घटना घडली. या अपघातात तीन जण जखमीही झाले. पण या अपघातातल्या जखमींना मदत करायची सोडून सगळयांनी पडलेल्या सफरचंदांवर डल्ला मारला. कोण सफरचंदांनी भरलेल्या पेट्या पळवतोय तर कुणी शर्टात सफरचंद भरतोय, असं चित्र सगळीकडे होतं…

close