नगरविकास खात्याची हार्ड डिस्क गहाळ

May 16, 2011 11:04 AM0 commentsViews: 8

16 मे

आदर्श घोटाळ्याप्रकरणी आज आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. आत्तापर्यंत आदर्श प्रकरणामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयामध्ये फाईल गायब झाली आहे.

याआधी राज्यातील नगरविकास खात्याकडे असलेल्या आदर्शच्या फाईलमधील महत्वाची पानंच याआधी गायब झाली. आणि आता याच नगरविकास खात्याच्या 10 पैकी एका कॉम्पूटरची हार्ड डिस्क गायब झाल्याची माहिती सीबीआयने आज आदर्श प्रकरणी सुनावणी दरम्यान कोर्टात दिली.

विशेष म्हणजे, नगरविकास खात्याच्या ज्या तीन अधिकार्‍यांना सीबीआयने आठ मे रोजी अटक केली आहे. त्यांच्यावरच हार्ड डिस्क गायब करण्याचा संशय आहे.

या तीनही अधिकार्‍यांची सीबीआय कोठडीची मुदत आज संपत होती. म्हणून सीबीआयने त्यांना कोर्टात हजर केले. त्यावेळी सीबीआयने या तिघांची सीबीआय कोठडी आणखी तीन दिवसांसाठी वाढवून देण्याची मागणी केली. कोर्टाने ही मागणी मान्य केली. आता हे तीनही अधिकारी हार्ड डिस्क गायब झाल्याप्रकरणी सीबीआय कोठडीत आहेत.

या प्रकरणातील तीन अधिकारी

- गुरुदत्त वाजपे- डेस्क ऑफिसर- एन.एम. नार्वेकर- असिस्टंट टाऊन प्लानर – वामन राऊळ- नगरविकास खात्याच्या प्रिन्सिपल सेक्रेटरीचे क्लर्क

close