पुण्यातील नद्यांना जलपर्णीचा वेढा !

May 16, 2011 2:19 PM0 commentsViews: 3

16 मे

नद्यांच्या प्रदुषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. शहरातील सांडपाण्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणार्‍या नद्यांचंही आरोग्य आता धोक्यात आले आहे.

पुणे शहरात सांडपाण्यामुळे जवळपास सर्वच नद्यांमध्ये जलपणीर्ंचे साम्राज्य पसरलं आहे. संरक्षक भींती फोडून मोठ-मोठ्या पाईपलाईनद्वारे सांडपाणी सोडल्याने नद्यांची अवस्था नाल्यांसारखीच झाली आहे. अशीच स्थिती पिंपरी चिंचवडच्या सर्वच नद्यांची झाली आहे.

पिपंरी-चिचंवड महापालिका या नद्यांच्या स्वच्छतेवर दरवर्षी 40 लाखाहून अधिक खर्च करते पण ही समस्या जैसे थे आहे.महापालिका आयुक्त मात्र सगळे आलबेल असल्याचे सांगत आहे. पण आयुक्त कितीही म्हणत असले तरी जोपर्यंत सांडपाणी थांबत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही असं तज्ञाचे मत आहे.

close