ममता बॅनर्जींनी घेतली सोनिया गांधींची भेट

May 16, 2011 2:25 PM0 commentsViews: 59

16 मे

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सत्तास्थापनेच्या हालचाली जोरात सुरू आहेत. त्यासाठीच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. आणि काँग्रेसला सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं.

त्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान रेल्वे मंत्रालयावर चर्चा झाली. ममता बॅनर्जी राज्याचे नेतृत्व करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये जाणार आहेत.

त्यामुळे त्यांचे रेल्वेखाते कोणाकडे जाणार याविषयीची चर्चा होती. पण रेल्वे मंत्रीपद तृणमूलकडेच राहील, असं त्यांनी पंतप्रधानांजवळ स्पष्ट केलं. ममता बॅनर्जी येत्या शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

ममतांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचे संकेत काँग्रेसने दिले आहेत. मंत्रिमंडळाचा आराखडा कसा असेल यावरही तृणमूल आणि काँग्रेसची चर्चा होणार आहे.

close