जैतापूर प्रकल्पासाठी लोक-लवाद स्थापन – कोळसे पाटील

May 16, 2011 12:13 PM0 commentsViews: 7

21 मे

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या अभ्यासासाठी एक लोक-लवाद स्थापन करण्यात आला आहे. या प्रकल्पाला विरोध करणार्‍या विविध संघटनांनी हा लोक-लवाद स्थापन केल्याची माहिती माजी न्यायमुर्ती बी. जी कोळसे पाटील यांनी दिली.

हा लवाद नि:पक्ष असून, सर्व पक्षांनी या लवादासमोर बाजू मांडावी असं आवाहनही त्यांनी केले आहे. अणुऊर्जेची उपयोगीता त्याचे फायदे, तोटे या सर्वांचा अभ्यास करून अहवाल तयार करणार आहे. जस्टिस ए.पी. शहा आणि जस्टिस एस.डी.पंडित हे लवादाचे कामकाज पाहतील.

19 ते 21 मे दरम्यान मुंबईत ही सुनावणी होणार आहे. मुख्यमत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जैतापूर प्रकल्पाची सुपारी घेतल्याची टीकाही कोळसे पाटील यांनी केली.

close