पेट्रोल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच भीकमांगो आंदोलन

May 16, 2011 3:01 PM0 commentsViews: 3

16 मे

पेट्रोल दरवाढी विरोधात शिवसेनेनं आज मिरज येथे भीकमांगो आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन करुन शिवसैनिकांनी सरकारचा तीव्र निषेध केला.

पेट्रोलच्या दरामध्ये सरकारने केलेल्या मोठ्या वाढीचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी भीक मांगो आंदोलन केलं. रस्त्यावरील येणार्‍या लोकांकडून तसेच रिक्षावाले, टांगेवाले आणि हातगाडीवाल्यांकडून भीक मागण्यात आली.

जमवलेली ही भीक सरकारला मनिऑर्डरने पाठवण्यात येणार आहे.शासनाच्या विरोधी बोंब मारुन शिवसैनिकांनी जोरदार निदर्शन केली.

close