नागपूर टेस्ट जिंकून गांगुलीला विजयी निरोप

November 11, 2008 6:18 AM0 commentsViews: 4

10 नोव्हेंबर नागपूर नागपूर टेस्टमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियावर 172 रन्सनं ऐतिहासिक विजय मिळवला आणि भारतानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर आपलं नाव सुवर्णक्षरात कोरलंय. हा विजय संपूर्ण भारतासाठी जितका खास होता तितकाच तो गांगुलीसाठी खास होता. भारतीय संघाला विजयाची सवय लावणा-या गांगुलीला जणू त्याच्या सहका-यांनी एकप्रकारे विजयी निरोपच दिला. ऑस्ट्रेलियाची बॅटिंग ढेपाळत होती आणि फक्त एक विकेट बाकी असताना धोणीनं कॅप्टनशिप शेवटची मॅच खेळणा-या गांगुलीच्या हाती सोपवली. त्यानेही सन्मानाने ती जबाबदारी स्वीकारली. हरभजननं मिशेल जॉन्सनची विकेट काढत भारताला विजय मिळवून दिला आणि सगळीकडे जल्लोष सुरू झाला.

close