‘सुपरस्टार’ सिनेमाचे म्युझिक रिलीज

May 16, 2011 3:28 PM0 commentsViews: 1

16 मे

साक्षी एन्टरटेंनमेंटच्या आगामी सुपरस्टार या सिनेमाचे म्युझिक रिलीज नुकतंच मुंबईत करण्यात आले. छोट्या पडद्यावर अनेक विनोदी रियालिटी शो आणर्‍या महेंद्र कदम यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे.

सिध्दार्थ जाधव आणि पंढरीनाथ कांबळे यांची धमाल जोडी या सिनेमात आपल्याला दिसणार आहे. नवतारका मेघा ही या सिनेमातून अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहे.

महत्वाचे म्हणजे मेघा ही या सिनेमाची निर्मातीसुध्दा आहे. या म्युझिक रिलीजवेळी सिनेमातील कलाकार आणि अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

close