संशयित सात नक्षलवाद्यांना 30 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी

May 16, 2011 4:56 PM0 commentsViews: 6

16 मे

नक्षलवादी असल्याच्या आरोपावरुन 25 आणि 27 एप्रिल रोजी ठाणे, पुणे आणि नाशिक येथून अटक केलेल्या सात जणांपैकी सहा जणांना 30 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अँजला सोनटक्के आणि सुषमा रामटेके यांच्या ठाण्यात झालेल्या अटकेनंतर या महत्वपूर्ण कारवाईने खर्‍या अर्थाने वेग घेतला होता. त्यानंतर अटक केलेल्या सिध्दार्थ जीवा भोसले याला मात्र अधिक तपासासाठी 26 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. हे नक्षलवादी पश्चिम बंगालमध्ये अनेक नक्षलवादी कारवाया केल्यामुळे वॉन्टेड होते.

close