वक्फ बोर्डाच्या 130 मालमत्तांवर स्थगिती

May 16, 2011 5:03 PM0 commentsViews: 1

16 मे

मुंबईतील वक्फ बोर्डाच्या 130 मालमत्तांवर विकास करण्याच्या धर्मदाय आयुक्तांनी दिलेल्या विविध परवानग्यांना स्थगिती देण्यात आली आहे. अशी माहिती औकाफ मंत्री नसीम खान यांनी दिली. 2004 ते 2011 या काळात वक्फ बोर्डाच्या 130 मालमत्तांवर विकास करण्याच्या परवानग्या देण्यात आल्या होत्या.

पण धर्मादाय आयुक्तांना वक्फ बोर्डाच्या जमिनींवर विकास करण्याची परवानगी देण्याचा अधिकार नाही, असं चौकशीत आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व परवानग्यांना स्थगिती देण्यात आली. तसेच यामध्ये दोषी असणार्‍या धर्मादाय आयुक्तालयातील अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल असं औकाफ मंत्री नसीम खान यांची सांगितले आहे.

close