कर्नाटकचे राज्यपाल हटवा एनडीएची मागणी

May 16, 2011 5:37 PM0 commentsViews: 3

16 मे

कर्नाटक सरकार बरखास्त करावे ही राज्यपाल हंसराज भारद्वाज यांची शिफारस केंद्र सरकार स्वीकारणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे हंसराज भारद्वाज यांच्यावर भाजपने हल्लाबोल केला आहे.

केंद्र सरकारने राज्यपालांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी एनडीएने केली आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली.

हंसराज भारद्वाज वारंवार घटनेविरोधी वक्तव्य करतात असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केला. कर्नाटकच्या भवितव्यावर जो काही निर्णय व्हायचा असेल, तो विधानसभेत होऊ द्या राजभवनात नको असं त्यांनी म्हटलं आहे.

close