राज्यभरात बुध्द जयंती उत्साहात

May 17, 2011 7:46 AM0 commentsViews: 134

17 मे

आज राज्यभरात बुद्ध जयंती साजरा केली जात आहे. वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला बुद्धाची जयंती साजरी केली जाते. जगाला शांततेचा, अहिंसेचा समतेचा संदेश देणार्‍या भगवान गौतम बुद्धाचे स्मरण करण्याचा हा दिवस. या दिवशी बुद्धाचे लाखो अनुयायी बुध्दगया येथे भेट देऊन तिथल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात.

आज बुध्द जयंती निमित्त मुंबई विद्यापीठातल्या पाली भाषा विभागात रांगोळी प्रदर्शन आयोजित केलं होतं. जे.जे.आर्ट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात गौतम बुद्धांच्या जीवनावरचे अनेक प्रसंग रांगोळीतून चितारले. गौतम बुद्धांच्या विविध मुद्रा या रांगोळीतून पाहायला मिळाल्या.

close